पावसाळ्यात कचऱ्याची समस्या अधिक गंभीर का होते आणि त्याबाबत आपण काय करू शकतो?

कडाक्याच्या उन्हाळ्यापासून दिलासा देत पावसाळा वातावरणात गारवा पसरवतो. पावसाळ्यातील वातावरण निसर्गाच्या विविध रंगांनी भरलेले,आल्हाददायक आणि उत्साही असते.  मात्र पावसाळा यासोबतच कचऱ्याबाबतची अनेक आव्हाने देखील घेऊन येतो. विशेषतः शहरी भागात रस्त्यावर टाकलेला कचरा आणि त्या कचऱ्याचे प्रमाण हे स्वच्छता दूतांसाठी एक मोठे आव्हान असते. रस्त्यावर टाकलेला कचरा जर उचलला गेला नाही तर तो पावसाच्या पाण्यासोबत नाले आणि सखोल भागात वाहून जातो आणि तिथे अडथळे निर्माण करतो.ओला कचरा लवकर सडत असल्याने दुर्गंधी, डासांची पैदास तसेच पाणी साचणे अशा गंभीर समस्या निर्माण होतात. प्लास्टिक कचरा देखील ड्रेनेज मध्ये अडथळे निर्माण करत या समस्येत अधिक भर पडते. यामुळेच जगभरातील शहरी रस्त्यांवर आणि आसपासच्या परिसरात पाणी साठणे हे एक नेहमीचेच  दृश्य बनत चालले आहे.  

याबद्दल आपण काय करू शकतो?

१. कचऱ्याची विल्हेवाट - कचरा व्यवस्थापनात महानगरपालिकेची प्रमुख भूमिका असली, तरी वैयक्तिक पातळीवर योगदान दिल्यास खऱ्या अर्थाने बदल घडू शकतो. कचरा वर्गीकरणामुळे केवळ पावसाळ्यातच नव्हे तर वर्षभरातील बहुतेक समस्या सोडवता येऊ शकतात.
२. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका - सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळा. एपीसीसीआयने शहरातील अनेक भागांमध्ये ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी डबे (बीन्स) बसवले आहेत.  
३. सिंगल युज प्लास्टिकचा वापर शक्य तितका कमी करा  - प्लास्टिकमुळे ड्रेनेज मध्ये कचरा अडकून अडथळे निर्माण होत असतात म्हणूनच पुन्हा वापरण्यायोग्य साहित्य आणि उत्पादनांचा वापर करणे हे प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठीचा महत्वाचा भाग ठरू शकते.

४. स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हा  - स्वयंसेवा हा आपल्या समाजाची सेवा करण्याचा आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता पसरवण्याचा तसेच समर्थन देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

अशा प्रकारे सोप्या कृतींद्वारे आपण आपल्या परिसरात लक्षणीय बदल घडवू शकतो आणि स्वच्छता निर्माण करू शकतो.

Popular posts from this blog

Become a conscious consumer- Ms.Amita Deshpande

Environmental Health: Safeguarding Our Future, Sustaining Our Planet

जागतिक वसुंधरा दिनाचे महत्व